Monday 13 March 2017

                                   वेळापूर केंद्राची शिक्षण परिषद दि. ८ मार्च २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून जि. प. प्राथमिक शाळा चव्हाणवाड़ी येथे घेण्यात आली. या शिक्षण परिषदेचे उद्घाटन माळशिरस तालुक्याचे सन्माननीय गट शिक्षणाधिकारी मा. धनंजय देशमुख साहेब व वेळापूर केंद्राच्या केंद्र प्रमुख सायरा मुलानी मैडम यांच्या हस्ते करण्यात आले.मा. देशमुख साहेबांचा सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक पदवीधर शिक्षक श्री. महादेव घोगरे सर यांनी केला. या शिक्षण परिषदेचे प्रस्ताविक श्रीम. देशमुख  मैडम यांनी केले व सूत्र संचालन श्रीम. शिंदे मैडम यांनी केले.


                                    या शिक्षण परिषदेसाठी वेळापूर पोलिस स्टेशन चे  सहाय्यक पोलिस निरीक्षक मा. विजय यादव साहेब आमच्या विनंतीला मान देऊन आवर्जून उपस्थित राहिले होते त्यांनी नोकरी करणाऱ्या महिलांच्या संरक्षणासाठी असलेले कायदे यांची माहिती दिली. मा. यादव साहेबांचा सत्कार मा. देशमुख साहेबांच्या हस्ते करण्यात आला

                                    महिला दिनानिमित्त महिलांच्या आरोग्यासंबधी घ्यावयाची काळजी या विषयवार डॉ शुभांगी माने-देशमुख यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. केंद्र प्रमुख श्रीमती सायरा मुलानी मैडम यांनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला


                             







    सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे नूतन चेअरमन मा. विट्ठलराव काळे सर यांचा सत्कार सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी संचालक श्री. रा. नि. जाधव सर यांच्या हस्ते करण्या   या शिक्षण परिषदेला चव्हाणवाडी शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य मा. तानाजी मुंगूसकर तसेच विद्यमान अध्यक्ष मा. नानासाहेब मुंगूसकर उपस्थित होते यांचाही सत्कार प्रशालेचे शिक्षक श्री. नितीन चव्हाण सर व श्री. पांडुरंग वाघ सर व श्री. खाड़े सर यांच्या हस्ते करण्यात आला.
                                     मा. देशमुख साहेब, मा. यादव साहेब, मा. मुलानी मैडम व मा. विठ्ठलराव काळे सर या मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या पिण्याच्या पाण्याची टाकीचे उद्घाटन करण्यात आले. मा. देशमुख साहेबांच्या हस्ते निबंध स्पर्धेत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक आलेली विद्यार्थिनी कु. निशा नानासो माने हिचा सत्कार करण्यात आला. तसेच उर्दू शाळेचे शिक्षक अखिल अहमद बजेबुरहान सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल मा. देशमुख साहेबांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर साहेबांनी चव्हाणवाड़ी शाळेचे व तालुका स्तरीय क्रीड़ा स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल पिसेवाड़ी शाळेचे अभिनंदन केले.

                                    कार्यक्रमात शेवटी श्री. नितीन चव्हाण सर यांनी गणित पेटीतील साहित्याची ओळख करून दिली व त्याच्या वापराविषयी
मार्गदर्शन केले.

No comments:

Post a Comment

                                   वेळापूर केंद्राची शिक्षण परिषद दि. ८ मार्च २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून जि. प. प्रा...